अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: July 15, 2017 00:50 IST2017-07-15T00:48:36+5:302017-07-15T00:50:07+5:30
खामगाव : लहान बहिणीस आणण्यासाठी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना पिंप्री गवळी येथे घडली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लहान बहिणीस आणण्यासाठी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना पिंप्री गवळी येथे घडली. याबाबत पिंप्री गवळी येथील ११ वर्षीय मुलगी गुरुवारी रात्री तिच्या आत्याच्या घरी लहान बहिणीस आणण्यासाठी जात असताना गावातीलच गब्बरसिंग गोविंदसिंग गहलोत याने तिचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. सदर प्रकार मुलीने नातेवाइकांना सांगितल्याने नातेवाइकांनी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून गब्बरसिंग गहलोतविरुद्ध कम ३५४ (अ) (१) भा.आर.डब्ल्यू. कलम ८ बालकांचे लैंगिक अपराधापासून अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.