जांभाेरा येथील आठवडा बाजारात साचला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST2021-09-08T04:41:12+5:302021-09-08T04:41:12+5:30

तालुक्यातील जांभोरा हे एक मोठे गाव आहे़ गावात शाळा,कॉलेज,मंगल कार्यालय, व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. रविवारी येथील आठवडी बाजार असतो. ...

Moisture in the weekly market at Jambhaera | जांभाेरा येथील आठवडा बाजारात साचला चिखल

जांभाेरा येथील आठवडा बाजारात साचला चिखल

तालुक्यातील जांभोरा हे एक मोठे गाव आहे़ गावात शाळा,कॉलेज,मंगल कार्यालय, व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. रविवारी येथील आठवडी बाजार असतो. सक्षम ग्रामपंचायत असताना येथील आठवडी बाजाराच्या जागेवर कोणत्याच सुविधा नाही याच वास्तव चित्र परवाच्या बाजारात पाहावयास मिळाले. सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे. पावसाने अनेक सेवा, व्यवस्थेचे पितळ उघड पाडले. त्यात जांभोरा येथील आठवडी बाजारदेखील आहे. ना रस्ते, ना बाजार वटे, ना छत नाही कोणत्या सुविधा असा येथील प्रकार आहे. व्यापाऱ्यांनी चिखलात आपली दुकाने थाटली. ग्राहकांनी चिखल तुडवीत बाजार केला. सध्या कोरोना असल्याने सरकारी निर्बंध आहेत. मध्यंतरी झालेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या किंवा आठवडी बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. बाजार कसेबसे सुरू झाले तर बाजार जागांची ही अवस्था व्यापार करावा तर कसा, असा प्रश्न व्यापारी आणि ग्राहक उपस्थित करीत आहेत.

Web Title: Moisture in the weekly market at Jambhaera