मॉडेल कॉलेजच्या जागेचा गुंता सुटला

By Admin | Updated: October 1, 2015 00:20 IST2015-10-01T00:20:37+5:302015-10-01T00:20:37+5:30

बुलडाण्यात होणार कॉलेज; अल्पावधीत मिळणार जागेचा ताबा.

Model school space was lost | मॉडेल कॉलेजच्या जागेचा गुंता सुटला

मॉडेल कॉलेजच्या जागेचा गुंता सुटला

नीलेश जोशी / खामगाव : बुलडाणा जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक उच्चतम पातळीवर नेण्याच्या दृष्टीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या योजनेचा भाग असलेल्या मॉडेल कॉलेजचा जागेचा बहुप्रतीक्षित प्रश्न निकाली निघणार आहे. या कॉलेजसाठी नियोजित केलेल्या जागेवरील ताब्यासाठी तांत्रिक त्रुटी दूर झाल्या आहेत तसेच चार वर्षांंपासून पडून असलेल्या आठ कोटी रुपयांच्या विनियोगासही आता परवानगी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. उच्च शिक्षणाच्या संधी आणि उच्च शैक्षणिक केंद्रांसंदर्भात देशातील ३७४ जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक न्यूनतम पातळीवर आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे जिल्ह्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाचा भाग असलेले हे मॉडेल कॉलेज महाराष्ट्रातील अवघ्या सात जिल्ह्यांना मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे या कॉलेजच्या जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे; मात्र ग्रामविकास मंत्रालय स्तरावर जागा हस्तांतरणासंदर्भातील तीन त्रुट्यांमुळे आठ कोटी रुपायंचा निधी उपलब्ध होऊनही या कॉलेजच्या जागेचा प्रश्न सुटलेला नव्हता. जून, जुलै महिन्यात त्रुटींची पूर्तता करूनही महसूल व वन मंत्रालयाकडून जागेच्या हस्तांतरणासंदर्भात हालचाली झाल्या नव्हत्या. सध्या हे मॉडेल कॉलेज बुलडाणा येथे ४५ हजार रुपये भाड्याच्या जागेत सुरू असून, केंद्र शासनाचे २ कोटी ६७ लाख, राज्य शासनाचे ५ कोटी ३३ लाख आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने १ कोटी ३३ लाख ५0 हजार रुपयांचा पहिला हप्ता पूर्वीच मंजूर केला आहे.

Web Title: Model school space was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.