मोबाइल चोर झाला ‘सीसी कॅमे-या’मध्ये कैद!

By Admin | Updated: August 30, 2016 01:31 IST2016-08-30T01:31:58+5:302016-08-30T01:31:58+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील घटना.

Mobile Thieves Captured in 'CC Cam-Ya'! | मोबाइल चोर झाला ‘सीसी कॅमे-या’मध्ये कैद!

मोबाइल चोर झाला ‘सीसी कॅमे-या’मध्ये कैद!

डोणगाव(जि. बुलडाणा), दि. २९: येथील आरेगाव रस्त्यावर चित्रगंधा स्टुडिओमध्ये सोमवारी दुपारी एका चोरट्याने मोबाइल चोरला; मात्र स्टुडिओमध्ये सीसी कॅमेरा असल्यामुळे चोरटा त्यामध्ये कैद झाला.
राजेश वाघमारे काही वेळेसाठी स्टुडिओमध्ये मोबाइल चाजिर्ंगला लावून बाहेर गेले होते. त्याच वेळेत तेथे शिरलेल्या चोरट्याने दुकानामध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेत मोबाइल लंपास केला. चोरटा सीसी कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्याने त्याला त्वरित अटक करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे. गत आठ दिवसात डोणगावात तीन चोर्‍या झाल्या आहेत. या चोरीतून अन्य चोरीही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Mobile Thieves Captured in 'CC Cam-Ya'!