डोणगावमध्ये मोबाइल चोर सक्रिय

By Admin | Updated: June 22, 2016 23:58 IST2016-06-22T23:58:39+5:302016-06-22T23:58:39+5:30

मुख्याध्यापकाचा मोबाइल लंपास.

Mobile Thieves Active in Donegaon | डोणगावमध्ये मोबाइल चोर सक्रिय

डोणगावमध्ये मोबाइल चोर सक्रिय

डोणगाव (जि. बुलडाणा): येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरत असून, गावाला जवळपास २५ ते २७ गावातील लोक आठवडी बाजारासाठी येत असतात; मात्र गत काही दिवसांपासून डोणगाव परिसरात पोलिसांचा धाक कमी झाल्यामुळे मोबाइल चोर सक्रिय झाले आहेत. मोबाइल चोर आठवडी बाजारात फिरुन ग्राहकांच्या मोबाइलवर डल्ला मारीत असताना आठवडी बाजारात गस्तीवर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या हातावर तुरी देऊन चोर मोबाइल चोरी करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पांगरखेड येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश जाधव हे बुधवारी बाजाराला आले असताना, त्यांचा ३१ हजाराचा मोबाइल चोरट्यांनी चोरला. याचबरोबर आणखीही काही मोबाइल चोरीला गेले. कुणीही पोस्टेला तक्रार दिली नाही. याचाच फायदा मोबाइल चोर घेत आहेत. अनेकांचे मोबाइल चोरी गेले व त्यांनी तक्रारही केली नाही.

Web Title: Mobile Thieves Active in Donegaon