मोबाइलच्या दुकानाला आग; दोन लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 20, 2016 01:51 IST2016-05-20T01:51:54+5:302016-05-20T01:51:54+5:30
सिंदखेड राजा येथील बसस्थानकाजवळील घटना.

मोबाइलच्या दुकानाला आग; दोन लाखांचे नुकसान
सिंदखेड राजा : येथील बसस्थानकाजवळील एका मोबाईल शॉपीला आग लागून दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १८ मे च्या रात्रीदरम्यान घडली आहे.
येथील बसस्थानकाजवळ मतीन अहेमद पठाण यांच्या मालकीची मोबाईल शॉपी आहे. या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मतीन पठाण याने त्वरित धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु दुकानात विद्युत पुरवठा असल्याने तो असफल झाला. दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर घटनेचा पंचानामा करण्यात आला आहे.