माेबाइल सेवा विस्कळीत,ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST2021-01-13T05:31:03+5:302021-01-13T05:31:03+5:30
दुसरबीड : गत १५ दिवसांपासून परिसरातील माेबाइल सेवा विस्कळीत झाल्याने माेबाइलधारक त्रस्त झाले आहेत. कुठल्याच कंपनीची रेंज राहत नसल्याने ...

माेबाइल सेवा विस्कळीत,ग्रामस्थ त्रस्त
दुसरबीड : गत १५ दिवसांपासून परिसरातील माेबाइल सेवा विस्कळीत झाल्याने माेबाइलधारक त्रस्त झाले आहेत. कुठल्याच कंपनीची रेंज राहत नसल्याने संपर्कच हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लासमध्येही व्यत्यय येत असल्याचे चित्र आहे. गत १५ दिवसांपासून दुसरबीड व परिसरात मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. मोबाइल कंपन्यांच्या हलगर्जीमुळे रेंजच राहत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सध्या ९ ते १२ वीपर्यंतच शाळा सुरू करण्यात आल्या असून इतर वर्गांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. ऑनलाइनसाठी ग्राहकांनी महागडे रिचार्ज केलेले आहेत. मात्र, रेंजच राहत नसल्याने इंटरनेट तर दूरच साधा काॅलही लागत नसल्याचे चित्र दुसरबीड परिसरात आहे. सर्वच कंपन्यांची हीच स्थिती असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.