मनसेचे जिल्हाप्रमुख वाघ भाजपामध्ये
By Admin | Updated: January 14, 2015 00:43 IST2015-01-14T00:43:11+5:302015-01-14T00:43:11+5:30
मनसेला धक्का ; मुंबईत झाला प्रवेश.

मनसेचे जिल्हाप्रमुख वाघ भाजपामध्ये
बुलडाणा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलडाणा जिल्हा प्रमुख तसेच जिल्हा परिषद सदस्य विनोद वाघ यांनी अखेर मनसेला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश घेतला. मुंबई येथे भाजपा कार्यालयात मंगळवारी १३ जानेवारीला हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
विधानसभा निवडणुकीनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हा वाघ आघाडीवर होते त्यामुळे ते पक्ष सोडतील अशी अटकळ होती ती खरी ठरली आहे. सिंदखेडराजा मतदारसंघातील तालुका प्रमुख, शाखाप्रमुख यांचीही पक्षप्रवेश सोहळय़ाप्रसंगी उपस्थिती होती. सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव जट्ट व दुसरबीड पंचायत समिती सर्कलचे सदस्य वाघ यांच्यासोबत भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा होती; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.