शपथ घेताना आमदारांनी लक्ष वेधले

By Admin | Updated: November 12, 2014 00:12 IST2014-11-12T00:12:42+5:302014-11-12T00:12:42+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील आमदारांची विधानसभेतील शपथविधी.

MLAs pointed out at the oath taking | शपथ घेताना आमदारांनी लक्ष वेधले

शपथ घेताना आमदारांनी लक्ष वेधले

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन १0 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, या मध्ये आमदारांचा शपथविधी झाला. यावेळी जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या निष्ठा व ङ्म्रद्धास्थाने व्यक्त करताना सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मरून, तर भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी आई-वडिलांचा उल्लेख करून शपथ घेतली. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय संविधानावर हात ठेवून गांभीर्यपूर्वक शपथ घेतली.
दुसर्‍यांदा सभागृहात दाखल झालेले आमदार राहुल बोंद्रे यांनी भरतीय स्वातंत्र्याचे जनक, सत्य आणि अहिंसेचा मंत्र जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मरून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. तसेच शपथेचा समारोप करताना ह्यजय जगत्, जय मानवह्ण अशा घोषणेद्वारे आपल्या शपथेचा समारोप केला.
आमदार डॉ. संजय कुटे यांनी सभागृहात दुसर्‍यांदा शपथ घेताना आई-वडिलांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनी राजमाता जिजाऊ मॉ साहेब, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वडील स्व. नरसिंगजी देशमुख यांचे स्मरण करून शपथ घेतली. आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी ईश्‍वराला स्मरण करून शपथ घेतली. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सभागृहात उपलब्ध करून दिलेले विविध धर्मग्रंथ बाजूला सारत भारतीय संविधानावर हात ठेवून छत्रपती शाहू महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्वसामान्य भारतीय नागरिक, कष्टकरी जनता यांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करीत गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. अँड. आकाश फुंडकर यांनी मतदारसंघातील जनतेसोबतच आई-वडिलांचे स्मरण करून शपथ घेतली. काल सभागृहात गैरहजर असलेले आमदार चैनसुख संचेती यांनी ईश्‍वराला स्मरून शपथ घेतली.

 

Web Title: MLAs pointed out at the oath taking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.