शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आ. गायकवाड यांनीच दिली मारहाणीची कबुली; गुन्हा का दाखल नाही? विरोधक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 05:11 IST

बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकास आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. 

बुलढाणा : शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका युवकास मारहाण केल्याची कबुली शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदारसंजय गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कबुली देऊनही गुन्हा दाखल करण्यामध्ये पाेलिस सुस्त का? आमदारांच्या दादागिरीचा प्रभाव पाेलिसांवरही आहे का ? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकास आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. 

वाघाची शिकार करून त्याचा दात जवळ बाळगल्याप्रकरणी वन खात्याने गुन्हा नाेंदविल्यानंतर नागपूरमधील महिलेची जमीन हडपल्याप्रकरणीही गायकवाड यांच्यावर गुन्हा नाेंदविला गेला. त्यानंतर युवकास केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.

पश्चात्ताप नाहीयुवकास मारहाण केल्याबाबत आपल्याला पश्चात्ताप होत नसल्याचेही आ. गायकवाड पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान, नशा करून व शस्त्र सोबत असलेले युवक शोभायात्रेत होते.

एका मुलीच्या तक्रारीनंतर आपण त्यांना मारहाण केली, असे आ. गायकवाड यांचे म्हणणे असले तरी युवकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले असताना लाेकप्रतिनिधीने पाेलिसाच्या काठीने युवकास झाेडपून काढणे कितपत याेग्य? असा प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत.

अहवाल सादर करूमारहाण प्रकरणात चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. सुमोटो तक्रार दाखल करून पोलिसांनीच तपास करणे हे कायद्याला तथा नैसर्गिक न्याय तत्त्वाला धरून नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले.

सध्या सातत्याने दहशतीचे राजकारण केले जाते आहे. वरपासून खालपर्यंत राजकारणाची तत्त्वे, विचार यांना तिलांजली दिली गेली आहे. मातृतीर्थ जिल्ह्याचे सुसंस्कृत राजकारण आता कलुषित होत आहे.- राहुल बोंद्रे, माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष, बुलढाणा

गायकवाड हे आमदार आहेत. कायद्यांचे पालन हे त्यांचे कर्तव्य आहे. एखादा चुकीचा वागत असला तर त्याला पोलिसांकडे द्यावे; पण येथे पोलिसाचीच काठी घेऊन त्यांनी मारहाण केली. पीडिताने बयाण द्यावे. आम्ही पाठीशी उभे राहू.- प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना ठाकरे गट 

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv SenaशिवसेनाMLAआमदार