शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर येथे डोक्यात घाव घालून मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:27 IST

मलकापूर : क्षुल्लक वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एका युवकाने डोक्यात घाव घालून मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे मलकापूर बाजार समिती जुन्या यार्डात उघडकीस आली. यामुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजुन्या मार्केट यार्डातील घटना पोलीस आरोपीच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : क्षुल्लक वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एका युवकाने डोक्यात घाव घालून मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे मलकापूर बाजार समिती जुन्या यार्डात उघडकीस आली. यामुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.मलकापूर शहरातील रेल्वेस्थानक परिसरात वास्तव्यास असलेला गजानन मारोती बोरकर (वय २५) या युवकाचा त्याचा मित्र सूरज धनंजय इंगळे (वय २६) याच्याशी शनिवारी रात्री वाद झाला होता. त्या दोघात चांगलीच हातापायी झाली. त्यात सूरजने गजाननच्या डोक्यात जड वस्तूचा  घाव केला. त्यात गजानन बोरकर याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊन तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.रविवारी पहाटे ६ वाजता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह शहरातील नागरिकही पोहोचले. बाजार समिती यार्डमध्ये झालेल्या खुनाची वार्ता शहरात पोहोचताच एकच खळबळ उडाली. शहर पोलिसांनी मृतकाची आई सुमन गजानन बोरकर (वय ५0 रा.रिसोड नाका वाशिम ह.मु. रेल्वे स्टेशन मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज इंगळेविरुद्ध अपराध नं.५४४/१७ कलम ३0२, ५0४ अन्वये भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लवंगळे करीत आहेत.कधी काळी जुने मार्केट यार्डमध्ये मोठा राबता होता; परंतु नवीन मार्केट यार्ड झाल्यामुळे येथे फारसे कोणी फिरकत नाही. त्यामुळे मद्यपी, जुगारी, भिकार्‍यांचे वास्तव्य अधिक आहे. आता याच ठिकाणी हा खून झाल्यामुळे हे जुने मार्केट यार्ड चर्चेत आले आहे. 

जुने मार्केट यार्ड पुन्हा चर्चेत मलकापूर बाजार समितीचे जुने मार्केट यार्ड एकेकाळी भव्य दिव्य असल्याने कामाचे होते; मात्र नवीन मार्केट यार्ड झाल्याने मागील अनेक वर्षांपासून जुने यार्ड अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. जुगारी, दारुडे, भिकार्‍यांचे वास्तव्य या ठिकाणी असते. आता त्याच जागी दोघांच्या वादात एकाची हत्या झाल्याने जुने मार्केट यार्ड पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात रेल्वे स्टेशनला अगदी जवळ असल्याने गुन्हेगारीसाठी ही जागा मोक्याची ठरत आहे. 

आरोपीचा शोध सुरूआरोपी फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा कसून शोध घेणे सुरू केला असून, विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात येत आहे. कुर्‍हा काकोडा, मुक्ताईनगर, सावदा फैजपूर आदी ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपीच्या नातेवाइकांकडे जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा