अल्पवयीन मुलांकडे दुचाकींची चावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:50 AM2021-01-08T05:50:44+5:302021-01-08T05:50:44+5:30

वाहन चालवण्यासाठी वयाची किमान १८ वर्षे पूर्ण असावीत, असा नियम आहे. याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केल्या जात असून, हा ...

Minors have bike keys | अल्पवयीन मुलांकडे दुचाकींची चावी

अल्पवयीन मुलांकडे दुचाकींची चावी

Next

वाहन चालवण्यासाठी वयाची किमान १८ वर्षे पूर्ण असावीत, असा नियम आहे. याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केल्या जात असून, हा नियम केवळ कागदावरच उरला आहे. मुख्य रस्त्यावर गर्दी असतानाही सुसाट वेगात दुचाक्या चालविणारे अप्रशिक्षित अल्पवयीन चालक कुणाचीही भीती न बाळगता राजरोस दुचाकीवर फिरताना दिसत आहेत; मात्र याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे. ५० सी.सी. क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेची गाडी चालविताना अल्पवयीन चालक, विना परवाना वाहन चालविणे आणि आरटीओकडे नोंदणी न करता वाहन चालविणे आदि कारणांसाठी कलम २७०(१) नुसार कारवाईस पात्र ठरतो. यामध्ये २ हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम आकारली जाते, तसेच दंड न भरल्यास गाडी जप्तीची कारवाईदेखील होते. ही कारवाई वाहतूक विभागाकडून केली जाते. गत काही दिवसांपासून अशा कारवाया हाेत नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवत आहेत.

Web Title: Minors have bike keys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.