लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले
By Admin | Updated: April 8, 2015 01:52 IST2015-04-08T01:52:44+5:302015-04-08T01:52:44+5:30
मेहकर तालुक्यातील घटना.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले
डोगणाव (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथून एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना ७ एप्रिल रोजी उघडकीस. घाटबोरी येथे अकोला जिल्हय़ातील तेलीपुरा बाळापूर येथील १५ वर्षीय मुलगी मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आपल्या मामाकडे आलेली होती. दरम्यान, बाळापूर तालुक्यातील बरवाळी येथील शिवा गणपत रणशिंगे याने सदर अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून २९ मार्च रोजी रात्री २ वाजता घाटबोरी येथून पळवून नेले. यासंदर्भात डोणगाव पोलीस स्टेशनला आरोपी शिवा गणपत रणशिंगे याच्याविरुद्ध ७ एप्रिल रोजी कलम ३६३, ३६६ अ, भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार घुगे, पोहेकाँ शरद बाठे हे करीत आहेत.