अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले !

By Admin | Updated: June 17, 2016 02:46 IST2016-06-17T02:46:21+5:302016-06-17T02:46:21+5:30

आरोपी गजाआड; आरोपी परभणी जिल्ह्यातील

Minor girl fudged! | अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले !

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले !

लोणार (जि. बुलडाणा) : मराठवाड्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणणार्‍या युवकास लोणार पोलिसांनी बस स्थानक परिसरात गुरुवारी पकडले. या युवकाविरुद्ध परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बेलखेडा येथील जालींदर रामचंद्र आघाव (२८) याने आपल्याच गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बेलखेडा येथून १३ जून रोजी पलायन केले. याबाबत मुलीच्या नातेवाइकांनी चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचा तपास लावण्यासाठी मराठवाड्यातील पोलिसांनी विदर्भातील लोणार पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावरून पोलीस निरीक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच लोणार पोलीस ठाण्यात रूजू झालेले उपनिरीक्षक मानगावकर यांनी साध्या वेशात बस स्थानकावर पाळत ठेवली. यामध्ये यश येऊन सायंकाळी या युगुलाला त्यांनी ताब्यात घेतले.

Web Title: Minor girl fudged!