अल्पवयीन मुलीला पळविले!

By Admin | Updated: November 16, 2016 03:02 IST2016-11-16T03:02:52+5:302016-11-16T03:02:52+5:30

बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथील घटना.

Minor girl escaped! | अल्पवयीन मुलीला पळविले!

अल्पवयीन मुलीला पळविले!

पिंपळगाव सैलानी, दि. १५- बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथे तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविण्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली.
ढासाळवाडी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच गावातील १८ वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेण्याची तक्रार फिर्यादी मुलीच्या आईने रायपूर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरुन ठाणेदार जे.एन.सय्यद यांनी तत्काळ या तक्रारीची दखल घेऊन रात्रीच या अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या तीन मुलांना अटक केली आहे.
ढासाळवाडी गावात अल्पवयीन मुलगी संध्याकाळी नळावर पाणी भरत असताना गावातील तरुणीने त्या मुलीला फूस लावून पळून नेले. त्या तरुणाला त्याचे साथीदार प्रशांत ऊर्फ बादल समाधान सुरडकर वय २0 वर्ष, बाल गुन्हेगार सोमनाथ फकीरा गायकवाड वय १६ वर्ष, सुनील संजय बोरडे वय १७ वर्ष सर्व राहणार ढासाळवाडी यांनी या तरुणाला व अल्पवयीन मुलीला मलकापूर रेल्वे स्टेशनवर या शालिमार एक्सप्रेसने बसून दिले.
या जोडप्यांच्या शोधासाठी ठाणेदार जे.एन.सैयद यांनी शोध पथक मुंबईकडे रवाना केले आहे. यामध्ये पी.एस.आय.व दोन पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत. आरोपी तरुण आकाश बाबूराव सावळे व अल्पवयीन मुलीचा शोध सुरू आहे.

Web Title: Minor girl escaped!