मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे अनुदान होणार खात्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:12 IST2017-10-26T16:11:02+5:302017-10-26T16:12:52+5:30
बुलडाणा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे अनुदान होणार खात्यात जमा
बुलडाणा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहय्यता बचत गटांना
मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
त्यामध्ये साडेतीन लक्ष रूपयांच्या कमाल मर्यादेत नऊ ते १८ अश्वशक्तीचा
मीनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने अर्थात कल्टीव्हेटर, रोटॅव्हेटर अथवा
ट्रेलरचा समावेश असणार आहे.
त्यासाठी ९० टक्के शासकीय अनुदान आणि दहा टक्के स्वयंसहाय्यता बचत गटाचा
हिस्सा राहणार आहे. या योजनेद्वारे वस्तू स्वरूपात मिळणार्या लाभांचे
हस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
त्यानुषंगाने इच्छूक बचत गटांनी विहीत नमुन्यातील अर्ज चार नोव्हेंबर
२०१७ पूर्वी बुलडाणा येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्या
कार्यालयात सादर करावे. अर्जासोबत बचत गट नोंदणी बाबत सक्षम
अधिकार्याच्या नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, बचत गटातील मूळ
सदस्यांची यादी, घटना व नियमावलीची प्रत, बचत गटातील सर्व सदस्यांचे
जातीचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र सादर
करावे. त्यासंदर्भात काही अटीही निर्देशीत केलेल्या आहेत. त्याचे पालन
करीत हा अर्ज भरणे आवश्यक आहे.