पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरुद्ध एमआयएमचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:44+5:302021-06-20T04:23:44+5:30
बुलडाणा : पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी ...

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरुद्ध एमआयएमचे आंदाेलन
बुलडाणा : पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मागील दीड वर्षापासून काेराेनामुळे अनेक लोकांचे व्यवहार बुडाले. अनेकांचा रोजगार गेला. उद्योगधंदे बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा बिकट परिस्थितीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे. त्यातच शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवून यात अधिकच भर टाकली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये २५ टक्के किंमत कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मोहम्मद दानिश शहराध्यक्ष एमआयएम, हुजैफा देशमुख, मो सादिक, शेख साजिद, शेख अनसार, साबिर खान, शेख सलमान, सैयद आकिब, सै. आदिल, शेख मोईन, शेख इर्शाद, अलताफ शेख, मोईन शेख, शाहरूख खान, नसिम अहेमद, सादिक शाह, आदी उपस्थित हाेते.