अंबिका अर्बन पतसंस्थेतील आगीत लाखोेंचे नुकसान

By Admin | Updated: April 14, 2017 13:32 IST2017-04-14T13:32:04+5:302017-04-14T13:32:04+5:30

येथील जिजामाता प्रेक्षगारमधील अंबिका अर्बन को आॅपरेटीव्हपतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले.

Millions of losses in Ambika Urban Credit Society | अंबिका अर्बन पतसंस्थेतील आगीत लाखोेंचे नुकसान

अंबिका अर्बन पतसंस्थेतील आगीत लाखोेंचे नुकसान

बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षगारमधील अंबिका अर्बन को आॅपरेटीव्ह
पतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले
असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. कार्यालयात चोरट्यांनी चोरी
करण्याकरिता सीसी कॅमेऱ्याची तार कापण्याचा प्रयत्न करीत असताना सदर आग
लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येथील जिजामाता प्रेक्षागारमध्ये अंबिका अर्बन को. आॅपरेटीव्ह पतसंस्थेचे
कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी रात्री काही चोरटे शिरले. चोरी
करण्याकरिता त्यांनी आधी सीटी कॅमेऱ्यांची तार कापण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यावेळी शॉट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. या आगीत कार्यालयातील दोन
एसी, संगणक, खुर्च्या व महत्वाचे कागदपत्रे जळाली असून, लाखो रूपयांचे
नुकसान झाले आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आर. ओ. यंत्र
विक्रीच्या दुकानात शुक्रवारी रात्री चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस
आले. सदर चोरट्यांनीच अंबिका अर्बनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत
असताना सदर आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Millions of losses in Ambika Urban Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.