शासकीय कार्यालयांकडे कोट्यवधींची थकबाकी
By Admin | Updated: May 13, 2014 22:49 IST2014-05-13T21:31:08+5:302014-05-13T22:49:00+5:30
स्थानिक नगर परिषदेकडून नागरिकांकडे हजारोच्या कर वसुलीसाठी तगादा लावण्यात येतो. मात्र न.प.चा कोट्यावधीचा कर विविध शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे.

शासकीय कार्यालयांकडे कोट्यवधींची थकबाकी
लोणार : स्थानिक नगर परिषदेकडून नागरिकांकडे हजारोच्या कर वसुलीसाठी तगादा लावण्यात येतो. मात्र न.प.चा कोट्यावधीचा कर विविध शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. शहरात शासकीय व निमशासकीय कार्यालये कार्यरत आहेत. मार्च महिन्यापूर्वी दरवर्षी विविध शासकीय कार्यालये त्यांच्याकडील न.प.च्या कराचा भरणा करतात. यावर्षी मात्र तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन, तालुका कृषी कार्यालय, बिएसएनएल कार्यालय, महावितरण दुय्यम निबंधक कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय मागासवर्गाचे मुलांचे वसतीगृह, उपकोषागार कार्यालय, पोलीस वसाहत, भगवानबाबा महाविद्यालय, महाराणाप्रताप विद्यालय यासह अनेक कार्यालयांनी न.प.च्या कराचा भरणा केलेला नाही. न.पची करवसुली समाधानकारक असल्यास शासनाकडून विविध योजनेचा निधी मिळण्यास अडचणी येत नाही. कराचा भरणा नसल्याने विकास निधीस खिळ बसला आहे.