शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बुलडाण्यात दूध आंदोलन पेटले, विकास, अमर दुधाच्या गाड्या फोडल्या, कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:47 AM

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने 16 जुलै मध्यरात्रीपासून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे.

बुलडाणा : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने 16 जुलै मध्यरात्रीपासून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. त्याचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा उमटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी दुधाचे वाहनाची तोडफोड केली.दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने खासदार राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली राज्यभर दूध आंदोलन सुरू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. दूध आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आशा प्रकारच्या घोषणा देत बुलडाणा जिल्ह्यातील वाघजाळ फाट्यावर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले विकास दुधाचे वाहन फोडले तर मलकापूर येथे अमर दुधाच्या वाहनाची हवा सोडून देण्यात आली. दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलन छेडल्याचे रविकांत तुपकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज गनिमी काव्याने राज्यात कुठे ना कुठे आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.