दुध व्यवसायातून झाली रोजगार निर्मीती!

By Admin | Updated: January 7, 2017 02:27 IST2017-01-07T02:27:27+5:302017-01-07T02:27:27+5:30

बुलडाणा जिल्ह्यात हजारो तरुणांनी दुग्धव्यवसायात रोजगार शोधला आहे.

Milk business generated from employment! | दुध व्यवसायातून झाली रोजगार निर्मीती!

दुध व्यवसायातून झाली रोजगार निर्मीती!

बुलडाणा, दि. ६- शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूवीर्पासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्‍चितपणे शाश्‍वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्य चांगला परवडतो. त्यामुळे या व्यवसायातून आज जिल्ह्यात हजारो तरुणांनी आपला रोजगार शोधला आहे.
शेतीला आर्थिक जोड म्हणून दुध व्यवसायकडे पाहले जात असतांना ग्रामीण भागास शहरी भागात वाढती दुधाची गरज लक्षात घेतला, आज जिल्ह्यातील युवक खाजगी व संस्थांच्या माध्यमातून दुध विक्री व्यवसायाकडे वळला आहे. जिल्ह्यात जवळपास ६७ शासकीय दुधसंस्था व सात खाजगी दुधसंस्था पाकिटबंद दुध निर्मिती करण्यात कार्यरत आहे.

रोजगारासाठी दुधसंस्थाचा हातभार
जिल्ह्यात प्रतिदिन ५ लाख १४ हजार लिटीर दुध उत्पादन होते. यातून अनेकांनी आपला रोजगार शोधला. आज दुध उत्पादक संस्थांनी रोजगार निर्मीतीची नविन संधी उलब्ध करुन दिली आहे. बोराखेडी, डोमरुळ, मलकापूर, खरबडी, धाड याशिवाय जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या बोधवड येथील दुधसंस्थाकडे ग्रामीण भागातील लहान मोठा दुध व्यवसायीका कडून दुध पुरवठा केला जातो. त्यांना चांगला दर ही मिळतो. शिवाय जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडून दुध व्यवसायासाठी विविध प्रोत्साहपर योजना राबवून दुध व्यवसाय व रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम आज केले जात आहे.

Web Title: Milk business generated from employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.