लष्करी अळीचा असा करावा प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:45+5:302021-08-20T04:39:45+5:30
वृक्षक्रांती मोहिमेतील विद्यार्थ्यांना विशेष गुण बुलडाणा : वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येत आहे. जिल्ह्यात ...

लष्करी अळीचा असा करावा प्रतिबंध
वृक्षक्रांती मोहिमेतील विद्यार्थ्यांना विशेष गुण
बुलडाणा : वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच लाख १४ हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विशेष गुण देण्यात येणार आहेत.
लसीकरण मार्गदर्शन शिबिराची गरज
बीबी: पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवतात. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनावरांना लसीकरण करणे महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जनावरांना लसीकरण का करावे, लसीकरणाची गरज व लसीकरणामुळे होणारे फायदे याबाबत माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरण मार्गदर्शन शिबिर घेण्याची गरज आहे.
विजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त
डोणगाव : सतत वीज गायब होत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा त्रास वाढला आहे. वीज गूल होत असल्यामुळे गैरसोय सहन करावी लागते. रात्रीच्यावेळी रस्त्यावर अंधार पसरल्याने येण्या-जाण्यास अडचणी निर्माण होतात.