सैनिकाचा युवतीवर अत्याचार

By Admin | Updated: February 10, 2016 02:13 IST2016-02-10T02:13:22+5:302016-02-10T02:13:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार.

Militant oppression of the soldier | सैनिकाचा युवतीवर अत्याचार

सैनिकाचा युवतीवर अत्याचार

अमडापूर: सैन्यातील एका जवानाने पिंपरखेड येथील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार ८ फेब्रुवारी रोजी अमडापूर पोलिसात करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. नजीकच्या पिंपरखेड येथील २२ वर्षीय युवतीने पोलिसात तक्रारी दिली की, सैन्यात कार्यरत असलेला बुलडाणा तालुक्यातील बोधेगाव येथील अमोल झणकलाल ब्राह्मणे हा २६ नोव्हेंबर २0१५ रोजी युवतीच्या घरी आला. मी तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष देत त्याने अत्याचार केला. यानंतर धोत्रानंदई व भुसावळ येथे नेऊन अत्याचार केला. युवतीने दिलेल्या या तक्रारीच्या आधारे अमडापूर पोलिसांनी आरोपी अमोल झणकलाल ब्राह्मणे रा. बोधेगाव याच्याविरुद्ध भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार निशांत मेश्राम करीत आहे.

Web Title: Militant oppression of the soldier