मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST2021-05-19T04:36:15+5:302021-05-19T04:36:15+5:30

पल्लवी गणेश चव्हाण (३०) आणि जान्हवी (३) अशी मृत झालेल्या दोघींची नावे आहेत. यासंदर्भात माळवंडीचे पोलीसपाटील संजय चव्हाण यानी ...

Miley's suicide by jumping into a well | मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पल्लवी गणेश चव्हाण (३०) आणि जान्हवी (३) अशी मृत झालेल्या दोघींची नावे आहेत. यासंदर्भात माळवंडीचे पोलीसपाटील संजय चव्हाण यानी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता रायपूर पोलिसांनी लगोलग घटनास्थळ गाठत दोघींचेही पार्थिव विहिरीतून बाहेर काढत पंचनामा केला. सोबतच पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ठाणेदार सुभाष दुधाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोलिस कॉन्स्टेबल शांताराम जगताप, श्रीकांत चिटवार यांनी घटनास्थळ गाठून हा पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे आणि त्यांचे सहकारी अमोल गवई हे करीत आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. आम्ही सध्या प्रकरणाचा तपास करत आहोत असे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी सांगितले.

Web Title: Miley's suicide by jumping into a well