मिहीर अपार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST2021-09-02T05:13:56+5:302021-09-02T05:13:56+5:30

पोलंड येथे पार पडलेल्या तिरंदाजी स्पर्धेत मिहीरच्या नेतृत्वात भारतीय संघाने अमेरिकेला नमवत सुवर्णपदक पटकावले. मोताळा तालुक्यातील खेडी शाळेचे ...

Mihir Apar felicitated | मिहीर अपार यांचा सत्कार

मिहीर अपार यांचा सत्कार

पोलंड येथे पार पडलेल्या तिरंदाजी स्पर्धेत मिहीरच्या नेतृत्वात भारतीय संघाने अमेरिकेला नमवत सुवर्णपदक पटकावले. मोताळा तालुक्यातील खेडी शाळेचे शिक्षक नितीन अपार यांचे चिरंजीव मिहीर याने जिल्ह्यासोबतच आपल्या देशाची मान जगात उंचावली आहे. यावेळी मिहीर अपारचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांची भारतीय प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल व मिहीरचे आजोबा जयभारत अपार, वडील नितीन अपार व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश समाधान जवकार यांचा सत्कार अदिती अर्बन परिवारातर्फे करण्यात आला. या विशेष सत्कारप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर डॉ. विनायक वाघ, सूर्यकांत अपार, संचालक सुशील पनाड, सरव्यवस्थापक शैलेंद्र मुळे, व्यवस्थापक पंकज शेजोळे, मुख्य वसुली अधिकारी अनिरुद्ध गायकवाड, अधीक्षक राजू वैद्य, जनसंपर्क अधिकारी राहुल हिवाळे, विभागीय अधिकारी समाधान गवई, व्यवस्थापक अनिकेत भिसे, तुषार वाघ, शंकर कड, सोशल मीडियाप्रमुख राहुल खरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Mihir Apar felicitated