वृक्षारोपणाने जपल्या वडिलांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:32+5:302021-04-08T04:34:32+5:30
देऊळगावराजा तालुक्यातील असोला जहाँगीरचे माजी सरंपच तथा श्रीक्षेत्र वैष्णवगडाचे अध्यक्ष रंगनाथराव साळुजी शेळके यांचे ३ एप्रिल रोजी वृध्दापकाळाने निधन ...

वृक्षारोपणाने जपल्या वडिलांच्या आठवणी
देऊळगावराजा तालुक्यातील असोला जहाँगीरचे माजी सरंपच तथा श्रीक्षेत्र वैष्णवगडाचे अध्यक्ष रंगनाथराव साळुजी शेळके यांचे ३ एप्रिल रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम ५ एप्रिल रोजी सोमवारी असोला जहाँगीर येथे पार पडला. रंगनाथराव शेळके यांच्या विचाराचा आणि संस्काराचा वारसा त्यांचे चिरंजीव डॉ. रामप्रसाद शेळके हे समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचे रक्षाविसर्जन व अस्थी नदीत न सोडता ज्या शेतीवर रंगनाथराव यांनी प्रेम केले त्याच शेतात खड्डा खोदून त्यामध्ये विसर्जन केले व त्या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाची लागवड केली. तेरवीचा खर्च न करता एक लाख रुपये गुंतवणूक करून त्यावरील दरवर्षी येणाऱ्या व्याजातून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. गावातील सर्व समाजातील गरजू लोकांना या व्याजातून शक्य होईल तेवढी मदत देण्याचा मानस कै. रंगनाथराव पाटील शेळके मानव सेवा ट्रस्ट स्थापन करून देण्यात येणार आहे.