कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST2021-03-13T05:03:21+5:302021-03-13T05:03:21+5:30
डॉ. पंदेकृवि, अकोला अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता असंख्य विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. असे असताना सुमारे ...

कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
डॉ. पंदेकृवि, अकोला अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता असंख्य विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. असे असताना सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटूनदेखील पदे भरली गेलेली नाही. यामुळे विद्यार्थी रोष निर्माण करीत आहेत. कार्यकारी परिषद सदस्यांकडे तक्रारी करीत आहेत. कोविडचे कारण समोर केले जाते आहे. परंतु, विद्यापीठातच इतर रिक्त पदे भरले जात आहेत. निवडणुका झाल्या, मोठमोठ्या सभा, मेळावे होत असताना कृषी सहायक पदभरती करताच कोरोनाचा अडसर का, असा प्रश्न उपस्थित करत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, पदभरती का रखडली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ऑनलाइन तक्रारींचा पाऊस शासनानकडे पडला आहे. अचानक निर्णयामध्ये बदल होत असल्याने असंख्य अडचणी विद्यार्थ्यांना उद्भवत आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरूनदेखील यादीत नावे दिसत नसल्याच्या तक्रारी असल्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनेक कृषी विद्यापीठात संपूर्ण फेऱ्या पूर्ण झालेल्या असताना बी.एस.सी., एम.एस.सी.(पीजी) च्या जागा रिक्त आहेत. यावर संबंधित कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडून उपाय योजना होऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे आवशक होते. आयसीएआर अंतर्गत असलेल्या रिक्त जागांबाबत तोडगा निघायला पाहिजे होता. परंतु, तो कोरोनाचे कारण समोर करून वेळकाढू धोरणामुळे कृषी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ह्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सदस्यांनी कृषी विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
राज्यपालांनी दिले कार्यवाहीचे आश्वासन
राज्यपालांनी याबाबत योग्य कार्यवाहीचे करण्याचे अश्वासन दिले आहे. यावेळी डॉ. पंदेकृवि सदस्य तथा महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखेडे, अकोला कृषी विद्यापीठाचे सदस्य विनायक सरनाईक, गणेश कंडारकर यांच्यासह अकोला व राहुरी कृषी विद्यापीठातील कार्यकारी परिषद सदस्यांची उपस्थिती होती.