कि.जट्ट ग्रामपंचायतीचा सदस्य अपात्र घोषित

By Admin | Updated: February 19, 2015 00:23 IST2015-02-19T00:23:18+5:302015-02-19T00:23:18+5:30

पत्नीच्या नावे रोपवाटिका मंजूर करणे भोवले.

Member of KJP Gram Panchayat declared ineligible | कि.जट्ट ग्रामपंचायतीचा सदस्य अपात्र घोषित

कि.जट्ट ग्रामपंचायतीचा सदस्य अपात्र घोषित

बुलडाणा : पत्नीच्या नावे रोपवाटिका मंजूर करणार्‍या लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट ये थील ग्रामपंचायतीच्या एका सदस्यास अप्पर जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये सोमवारी अ पात्र ठरविले आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत वतरुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट ग्रामपंचायतीने १0 मे २0१२ रोजी ग्रामसभा आयोजीत केली होती. त्यामध्ये ठराव क्रमांकामध्ये ग्रामपंचायत सदस्य गजानन मुर्तडकर, सुभाष प्रभु राठोड व सुरेश परशराम जाधव यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून घरातील सदस्यांच्या नावे मनरेगा अंतर्गत रोपवाटीका मंजूर केली. रोपवाटीकेचे काम दिलेली व्यक्ती रोपांची विक्री करून नफा मिळवू शकते. त्यामुळे तीनही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार गावातीलच वसंता लिाांजी मुळे, निलेश भवगान महाजन, सुरेश पवार, जानकी सिमाराम महाजन, इंदु रामराव आडे व सुमन सुभाष लाड यांनी अँड. धिरज मुंदे यांच्या मार्फत अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे केली. त्यावर रोपवाटिकेच्या ठरावाची अंमलजावणी ग्रामपंचायतीने केली असती, तर सुरेश परशराम जाधव यांची पत्नी गंगुाई जाधव यांना लाभ मिळाला असता. त्यामुळे कलम १४ (ग) नुसार त्यांना अपात्र घोषीत करण्यात येत आहे, असा निर्णय दिला. अर्जदाराच्या वतीने अँड. धिरज मुंदे यांनी काम पाहिले.

Web Title: Member of KJP Gram Panchayat declared ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.