मेहकर पंचायत समिती सदस्याचे ६० हजार रुपये पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:02 IST2017-07-29T23:46:32+5:302017-07-30T01:02:28+5:30

mehkar PC member's Rs,60 thousand stolen | मेहकर पंचायत समिती सदस्याचे ६० हजार रुपये पळविले!

मेहकर पंचायत समिती सदस्याचे ६० हजार रुपये पळविले!

ठळक मुद्देकपडे खरेदी करीत असताना दुकानात असलेल्या काही महिलांनी पर्समधील ६० हजार रुपये लंपास केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकर पंचायत समितीच्या सदस्य नीता दिलीप देशमुख ह्या मेहकर येथील भोगी कापड दुकानामध्ये खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्या पर्समधून ६० हजार रुपये चोरी गेल्याची घटना २९ जुलै रोजी दुपारी ३.१५ ला घडली.
विश्वी, तालुका मेहकर येथील पंचायत समिती सदस्य नीता दिलीपराव देशमुख ह्या कपडे खरेदीसाठी स्थानिक सावजी गल्लीमधील भोगी कापड दुकानामध्ये गेल्या होत्या. कपडे खरेदी करीत असताना दुकानात असलेल्या काही महिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवत त्यांच्या पर्समधील ६० हजार रुपये लंपास केले. सदर प्रकार नीता देशमुख यांच्या लक्षात येताच त्या महिला दुकानातून पसार झाल्या. नीता देशमुख यांचे पती दिलीप देशमुख यांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली. ठाणेदार मोतीचंद राठोड यांनी सदर प्रकाराची दखल घेऊन दुकानात असलेले सीसी फुटेजची तपासणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Web Title: mehkar PC member's Rs,60 thousand stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.