मेहकर : रेवती काळे यांचे  पं. स. सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:28 IST2018-02-03T00:27:55+5:302018-02-03T00:28:15+5:30

मेहकर :   शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य रेवती विनोद काळे यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. निर्धारित मुदतीत त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे २९ जानेवारी रोजी संबंधित आदेश काढण्यात आला. 

Mehkar: Revathi Kale's Pt. S Unsubscribe | मेहकर : रेवती काळे यांचे  पं. स. सदस्यत्व रद्द

मेहकर : रेवती काळे यांचे  पं. स. सदस्यत्व रद्द

ठळक मुद्देजात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सदस्यत्व रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर :   शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य रेवती विनोद काळे यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. निर्धारित मुदतीत त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे २९ जानेवारी रोजी संबंधित आदेश काढण्यात आला. 
फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील पिंप्रीमाळी गणातून शिवसेनेच्या तिकीटावर रेवती विनोद विनोद काळे या ओबीसी प्रवर्गातून विजयी झाल्या होत्या; मात्र सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल तहसीलदार संतोष काकडे यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २९ जानेवारी रोजी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

Web Title: Mehkar: Revathi Kale's Pt. S Unsubscribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.