शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : तालुक्यातील चार गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:01 IST

जानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्‍हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य  धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार  माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सोमवारला जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा  यांच्याकडे केली आहे. 

ठळक मुद्देमाजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्‍हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य  धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार  माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सोमवारला जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा  यांच्याकडे केली आहे. सुबोध सावजी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बार्‍हई ता. मेहकर या गावात  क्षारयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे मुतखडा, पोटाचे विकार व किडनीचे विकार होत आहेत.  गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, गावकर्‍यांनी तक्रारी करूनसुद्धा याकडे  कुणीच लक्ष दिलेले नाही. कल्याणा ता.मेहकर येथील पाणी पुरवठा नळयोजनेचे पाणी हे  पिण्यास अयोग्य आहे, असा शासकीय अहवाल आहे आणि या पाण्यामुळे पोटाचे  विकार, अंगाला खाज येणे तसेच इतरही रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. लोणी गवळी येथे  शासकीय नळयोजनेद्वारा येणारे पाणी पिण्यास अयोग्य आहेच; परंतु इतर वापरातील  पाणीसुद्धा अंगाला खरूज होणे, अंगाला खाज सुटणे आणि इतर आजारांना निमंत्रण  देणारे ठरत आहे. मेळजानोरी या गावातील जनतेस पिण्यासाठी व वापरासाठी केवळ हात पंपाचेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या हातपंपाच्या पाण्याच्या वापराने क्षारयुक्त  पाण्यामुळे शाळकरी मुलांपासून तर गावकर्‍यांचे सर्वांचे दात किडले आहेत, तसेच  सर्वांच्याच दातांवर काळे डाग पडत आहेत. येथील जनतेने दातांच्या आजारावर १0 ते  १५ हजार रुपये खचरुनसुद्धा दातांचा आजार ‘जैसे थे’ आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी  व मुतखड्याच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन आरोग्य  पथक पाठवून जनतेचे जीवन वाचवावे, अशीही मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी  यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे. 

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपासbuldhanaबुलडाणाWaterपाणी