मेहकर पालिका निवडणुक; मोर्चे बांधणीला सुरुवात
By Admin | Updated: July 9, 2016 00:18 IST2016-07-09T00:18:04+5:302016-07-09T00:18:04+5:30
डिसेंबरमध्ये मेहकर पालिका निवडणूक; सत्ताधारी विरोधाकमध्ये आरोपप्रत्यारोप.

मेहकर पालिका निवडणुक; मोर्चे बांधणीला सुरुवात
सिद्धार्थ आराख / मेहकर(जि. बुलडाणा)
येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणूकीमध्ये इच्छुकांनी मोचेर्बांधणी सुरू केली असून ऐनवेळी या निवडणूकीत अनेकांना झटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारीत आहेत, त्यामुळे ये ती निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. मेहकर शहराची नुकतीच नव्याने प्रभाग रचना करण्यात आली असून २४ वार्डाचे १२ प्रभाग करण्यात आले आहेत. या वार्डाचे आरक्ष सोडत होऊन आणि प्रभागाची सिमा निश्चित झाल्यानंतर त्या - त्या प्रभागातील नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. अनेक प्रस्थापित नकरसेवकांचे वार्ड तुटून दुसर्या वार्डात गेल्याने त्यांची पंचायत झाली. तर काहींना आयतेच गठ्ठा मतांचा तुकडा मिळाल्याने त्यांना मात्र ही प्रभाग रचना अनुकूल असल्याने ह्यकही खुशी, कही गमह्ण अशी आवस्था नगरसेवकांमध्ये झाली आहे.
मात्र ज्यांना नविन वार्डरचना गैरसोयीची झाली आहे अशा अनेक आजी माजी विरोधी नगरसेवकांनी या वार्ड रचनेवर आक्षेप घेत सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून वार्ड रचना झाल्याचा आरोप केला आहे. वास्तविक या आरोपात तथ्य नसल्याचे सत्ताधार्यांचे म्हणने आहे. पालिकेच्या निवडणूका जवळ आल्या, त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या अशा फैरी होणार आहेत. निवडणूकांना सामोरे जायाचे म्हणजे सत्ताधार्यांचे वाभाडे काढल्याशिवाय विरोधकांना जनतेसमोर जाता येत नाही.
सध्या काँग्रेसकडे बहुमत असल्यामुळे पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. मागील साडेचार वर्षात काँग्रेसने नगर पालिकेत मनाप्रमाणे सत्ता राबविली. अर्थात विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या संमत्तीनेच काँग्रेसला हे सारे करता आले. हे नागरीकांना चांगलेच माहित आहे. मागील साडेचार वर्ष काँग्रेसच्या विरोधात ब्र शब्दही न काढणार्या शिवसेनेने मागील आठवड्यात रस्त्याच्या एका कामावरून काँग्रेसला विरोध केला. काँग्रेसने सुध्दा लगेच नमते घे तले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. हे नागरीकांना वेगळे सांगण्याची गरज नाही.