मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:26 IST2018-03-31T00:26:59+5:302018-03-31T00:26:59+5:30

डोणगाव :  पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Mehkar: one young died who went to swimming | मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!

मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!

ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील बेलगाव येथील घटना

बुलडाणा न्यूज नेटवर्क
डोणगाव :  पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
बेलगाव येथील दयाराम फकीरा इंगळे यांचा एकुलता एक मुलगा शुभम दयाराम इंगळे (१७) हा ३० मार्चला दुपारी काही मुलांसोबतच पोहण्यासाठी महादेव ओलांडा शेतशिवारात गेला होता. विहिरीत त्याने उडी मारली; मात्र तो विहिरीतील पाण्यातून बाहेर आला नाही. त्याला पोहणे येत होते; मात्र तो विहिरीतील पाण्यातून बाहेर न आल्याने  तेथे उपस्थित असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारील शेतातील लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. सोबतच विहिरीत शुभमचा शोध घेतला; मात्र तोवर शुभमची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी मृत शुभमच्या वडिलांनी डोणगाव पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Mehkar: one young died who went to swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.