शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

मेहकर : २०० किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 18:14 IST

मेहकर : खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे मेहकर मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार आहेत. 

ठळक मुद्दे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता असल्याने  लवकर नुतनीकरण होत नव्हते. शासन दरबारी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची अनेक वेळा भेट घेऊन रस्ते हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.या रस्त्यांची दर्जोन्नती झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच हे रस्ते चकचकीत होणार आहेत.

मेहकर : खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे मेहकर मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार आहेत.     जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यातील आठ रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता असल्याने  लवकर नुतनीकरण होत नव्हते.  या परिसरातील नागरिक अनेक वेळा खा.प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत होते. ही समस्या ओळखून खा.प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे व मेहकरचे उपविभागीय अभियंता सुनील खडसे यांना रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगून तो मुख्य अभियंता अमरावती यांच्याकडे पाठविण्याबाबत सांगितले होते. तर जिल्हा परिषदेने सुद्धा या हस्तांतरणाबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला होता. शासन दरबारी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची अनेक वेळा भेट घेऊन रस्ते हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १३ जुन रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपत्रक काढून आठ रस्त्यांची दर्जोन्नती केली आहे. त्यामुळे आता हे रस्ते सार्वजनिक विभागाकडे येणार आहेत. यामध्ये गोमेधर, लोणी काळे, रत्नापूर, लावणा, मोळा पिंपरीमाळी, मेहकर रस्ता २१ किलोमीटर देऊळगाव कोळ, कोनाटी, पिंपरी खंदारे, ब्राह्मण चिकना, हिवराखंड, शिंदी, मातमळ सरस्वती, लोणार हा रस्ता १६ किलोमिटर मलकापूर पांग्रा, झोटिंगा, देऊळगाव कोळ,  खळेगाव, कारेगाव, कोयाळी, पिंपळखुटा  रस्ता २९ किलोमिटर मेहकर, अंत्री देशमुख, गुंधा रस्ता १४ किलोमिटर, गोरेगाव, पांग्री काटे, वडगाव माळी, चायगाव, मेहकर रस्ता १८ किलोमिटर द्रृर्गबोरी, भोसा, लोणी गवळी, उमरा देशमुख, शहापूर, जामगाव हा रस्ता २६ किलोमिटर@दहीगाव, मंगरुळ नवघरे, सावखेड, खुदनापूर, कळमेश्वर, सोनार गव्हाण, शेंदला, मोळा, आंध्रृड हा रस्ता ५४ किलोमिटर व शेंदुर्जन, सायाळा, कळपविहीर, बरटाळा २० किलोमिटर या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची दर्जोन्नती झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच हे रस्ते चकचकीत होणार आहेत, अशी माहिती स्वीय सहाय्यक रुपेश गणात्रा यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर