शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:26+5:302021-02-05T08:31:26+5:30

शासकीय पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखार आलेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या विविध विभागामध्ये कार्यरत ...

Meeting of Government Re-appointed Ex-Servicemen Association concluded | शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची बैठक संपन्न

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची बैठक संपन्न

शासकीय पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखार आलेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या विविध विभागामध्ये कार्यरत तसेच रुजू असलेल्या वीरपत्नी यांच्या अडचणींचे निराकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून येत्या १३ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. दरम्यान, बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात महत्त्वाचे धोरण ठरणार असल्याने सर्व शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ठेंग यांनी केले. यावेळी नागपूर जिल्हाध्यक्ष संतोष मलेवार, बुलडाणा जिल्हा संघटनेचे केशव सोनुने, रमेश जोहरे, तालुकाध्यक्ष बबन आंभोरे, जिल्हा महिला प्रमुख उज्ज्वला कुळकर्णी, लोणार तालुकाध्यक्षा छाया साळवे, दत्तात्रय घ्याळ, एम.टी.इंगळे यांची उपस्थिती होती. दरम्यान, बुलडाणा येथील कार्यक्रमाबाबत केशव सोनुने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Meeting of Government Re-appointed Ex-Servicemen Association concluded