उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मेळावा

By Admin | Updated: June 15, 2017 00:24 IST2017-06-15T00:24:00+5:302017-06-15T00:24:00+5:30

चार कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती

Meet today in the presence of Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मेळावा

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवार, १५ जून रोजी संतनगरी शेगाव येथे श्रींचे दर्शन तसेच शिवसेना पदाधिकारी मेळाव्यानिमित्त येत आहेत.
या मेळाव्यास शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, संजय राठोड, गुलाबराव पाटील यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील खासदार, आमदार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. खा. विनायकराव राऊत यांनी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेना खा. प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जालिंधर बुधवंत, जिल्हा उपप्रमुख शांताराम दाणे, संतोष लिप्ते, शेगाव तालुकाप्रमुख रमेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आदींनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

Web Title: Meet today in the presence of Uddhav Thackeray