एम.एड्. अभ्यासक्रमाला विद्यापीठाचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:13 IST2017-08-12T01:12:32+5:302017-08-12T01:13:12+5:30

बुलडाणा: बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम. एड्. अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिरवा कंदील दर्शविला आहे. २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात शासकीय अध्यापक विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. 

M.Ed. The University's Green Lantern | एम.एड्. अभ्यासक्रमाला विद्यापीठाचा हिरवा कंदील

एम.एड्. अभ्यासक्रमाला विद्यापीठाचा हिरवा कंदील

ठळक मुद्देबुलडाणा शासकीय अध्यापक महाविद्यालयात होणार प्रवेश २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश देण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम. एड्. अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिरवा कंदील दर्शविला आहे. २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात शासकीय अध्यापक विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. 
डी.एड्., बी.ए., बी.एड्., एम.ए. आणि एम.एड्. यासारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. त्यामुळे अशा अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे महाविद्यालयांना अडचणीचे जात आहे. परिणामी अनेक महाविद्यलायातील मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम बंद पडत आहे. सन २0१४ मध्ये बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम.एड्.  अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांंचे प्रवेश न मिळाल्यामुळे हा अभ्यासक्रम बंद झाला होता. गेल्या तीन वर्षांंपापासून बंद असलेला अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाविद्यलायाकडून प्रयत्न करण्यात येत होते. 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ८ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २0१७-१८ पासून एम.एड्. अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रथम वर्षाला ५0 विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी शिफारस केलेली आहे.  सन २0१४ मध्ये बंद पडलेल्या एम.एड्.अभ्यासक्रमाला पुनर्जीवित करून सर्व प्राधिकरणाच्या मान्यता प्राप्त करून बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यासाठी इच्छुक असणार्‍यांना ही महत्त्वपूर्ण संधी शासकीय अध्यापक महाविद्यालयामुळे प्राप्त झाली आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरू
शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा येथे एम.एड्. अभ्यासक्रमात विषयांसाठी पर्याय निवडण्याची प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंंत  सुरू राहणार आहे. या विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून डॉ. रोहिणी तडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. गायकवाड यांनी केले आहे. 
 

Web Title: M.Ed. The University's Green Lantern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.