रस्त्यावरच फेकले जातात मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:06+5:302021-04-23T04:37:06+5:30
मास्कचा वापरामुळे स्व:ताची सुरक्षितता बाळगताना इतरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या ग्रामीण भागासह परिसरात सुरू आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी ...

रस्त्यावरच फेकले जातात मास्क
मास्कचा वापरामुळे स्व:ताची सुरक्षितता बाळगताना इतरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या ग्रामीण भागासह परिसरात सुरू आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हात स्वच्छ धुवावेत, मास्क कोणते आणि कसे वापरावेत याबाबत जनजागृृृृतीची गरज आहे. सध्या बाजारात साबण, सॅनिटायझर तसेच मास्कचा मोठ्या प्रमाणात खप झालेला आहे. घराबाहेर पडताना, प्रवास करताना जास्तीत जास्त लोक मास्कचा वापर करताना दिसतात. कोरोना विषाणूपासून बचाव होण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण घराबाहेर मास्क लावून पडत आहेत. त्यामुळे मास्क तसेच सॅनिटायझर यांना जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत. दिवसभर मास्क लावून बाहेर पडत असल्याने मास्कचा बाहेरचा भागावर अनेक विषाणू असू शकतात. त्यामुळे हे मास्क वापरल्यानंतर एखाद्या कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याऐवजी ते रस्त्यावर कुठेही टाकले जातात.