शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

ज्या मैदानाने घडविले त्याच मैदानात शहीद कैलास पवारांना विसावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 11:02 AM

Martyr Kailas Pawar : चिखलीचे वीरपुत्र कैलास भारत पवार यांना ४ ऑगस्ट रोजी स्थानिक तालुका क्रीडा संकुलावर अखेर निरोप देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अगदी लहानपणा पासूनच सैन्यात दाखल होवून देशसेवा करायची, हे ध्येय उराशी बाळगून कठोर परिश्रमाने सैन्यदलात दाखल झालेले चिखलीचे वीरपुत्र कैलास भारत पवार यांना ४ ऑगस्ट रोजी स्थानिक तालुका क्रीडा संकुलावर अखेर निरोप देण्यात आला. घरची परिस्थिती बेताची, त्यात किरकोळ शरीरयष्टी. यावर मात करून सैन्यदलात दाखल होण्यासाठी शहीद पवार यांनी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात अहोरात्र सराव केला होता. ज्या मैदानातून ते घडले, त्याच मैदनात विशाल जनसागाराच्या साक्षीने विसावले आहेत.वडील गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करतात. परंतू, सध्या आजारपणामुळे काम करू शकत नाहीत. आई उज्वला ह्या अंगणवाडी सेविका आहेत. लहान भाऊ अक्षय व बहीण पूजा दोघांचे शिक्षण सुरू आहे. अशी कौटूंबिक पार्श्वभूमी असलेल्या शहीद कैलास पवार यांनी सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. १२ नंतर प्रचंड जीद्द आणि मेहनतीच्या बळावर २०१६ मध्ये नांदेड येथे आर्मीत दाखल झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १०-महार रेजिमेंटमध्ये त्यांची पोस्टींग झाली होती. ज्या मैदानातील मातीत ते घडले त्याच मैदानातील मातीत विलीन होतांना रिमझिम बरसणारा पाऊस पाहता जणू आभाळ देखील आसवे गाळत असल्याचा भास होत होता.

कुटुंबियांकडे राष्ट्रध्वज सोपवलायावेळी महार रेजिमेंटचे लेप्टनंट कर्नल विनोद गवई यांनी वीरमाता उज्वला पवार यांच्याकडे राष्ट्रध्वज सोपवला. त्यावेळी कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या होत्या. उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही यावेली अेालावल्या होत्या. शहीद कैलास पवार याचा राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला व काश्मीरमध्ये तैनात असलेल्या मिळाने वीर जवान तुझे सलाम असे म्हणताच उपस्थित गहीवरले होते. हे दोघे ही जिवलग मित्र होते.

५ ऑगस्टला येणार होते घरीसुटी मिळल्याने ५ ऑगस्टला ते चिखलीत घरी येणार होते. मात्र, त्यापूर्वीत त्यांना विरगती प्राप्त झाल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाव दु:खाचा हिमालयच कोसळला. शहीद पवार यांच्या घरी कैलास पवार यांच्या पार्थिवाचे कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या वाहनात तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. पुंडलिक नगर, खंडाळा रोड चौफुली बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलावर अंत्ययात्रा पोहोचली व तेथेच त्यांच्या पार्थिवार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :ChikhliचिखलीMartyrशहीद