शेंदला येथे विवाहित महिलेचा विनयभंग

By Admin | Updated: September 24, 2016 02:26 IST2016-09-24T02:26:38+5:302016-09-24T02:26:38+5:30

मेहकर तालुक्यातील घटना.

Married woman in Senegal | शेंदला येथे विवाहित महिलेचा विनयभंग

शेंदला येथे विवाहित महिलेचा विनयभंग

मेहकर (जि. बुलडाणा), दि. २३- तालुक्यातील शेंदला येथील एका ३0 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेंदला येथील आरोपी गोविंद सुभाष रहाटे याने गुरुवारी रात्री गावातीलच एका विवाहित महिलेच्या घरात घुसून वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन जानेफळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५१, ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पीएसआय राठोड हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे, तसेच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Married woman in Senegal