सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: November 9, 2014 23:12 IST2014-11-09T23:12:32+5:302014-11-09T23:12:32+5:30
संग्रामपूर तालुक्यातील घटना.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
संग्रामपूर (बुलडाणा): तालुक्यातील काकणवाडा खुर्द येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ नोव्हेंबरच्या रात्री घडली. याबाबत मृत विवाहितेच्या मामाने तामगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मृतकाच्या पतीसह सासू, दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला व पतीला अटक करून पोलिस कोठडी देण्यात आली.
तालुक्यातील काकणवाडा खुर्द येथील मीना संजय झालटे (वय २४) या विवाहितेने घरात अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतले. सासरकडून होणारा त्रास असह्य झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच तामगाव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भगवान राठोड व सहायक उ पनिरीक्षक शेषराव पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी मृ तकचे मामा अशोक गोविंदचंद खवले (रा. हिंगणा भोटा) यांनी तामगाव पोलिस ठाण्याला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मृतकाचा पती संजय झालटे, सासू व दिर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे.