विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 14, 2017 00:44 IST2017-04-14T00:44:53+5:302017-04-14T00:44:53+5:30
खामगाव : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेच्या सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा
खामगाव : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेच्या सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तालुक्यातील अटाळी येथे घडली.
याबाबत नसरीन साबीर देशमुख (वय २५) रा.अटाळी या विवाहितेने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, की मेटॅडोर घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आण, यासाठी पती साबीर शकूर देशमुख यांच्यासह खलील देशमुख, करीम शकील देशमुख, डॉ.शेख वसीम, रिहाना खलील देशमुख, मुस्कान खलील देशमुख, शकील मुर्तुजा देशमुख आदींनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केल. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरुद्ध कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.