‘त्या’ विवाहितेचा गळा आवळून खून

By Admin | Updated: May 29, 2015 00:08 IST2015-05-29T00:08:55+5:302015-05-29T00:08:55+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी येथील घटना; सहा आरोपींना अटक.

'That' marriage to the victim's neck | ‘त्या’ विवाहितेचा गळा आवळून खून

‘त्या’ विवाहितेचा गळा आवळून खून

नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील वडनेर भोलजी येथील २२ वर्षीय विवाहितेचा माहेरवरुन पैसे आणले नाही म्हणून गळा आवळून खून केल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३0 वाजता घडली. याबाबत नांदुरा पोलिसांनी सहा आरोपींना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. शे.उस्मान शे. गनी वय ५0 रा. मलकापूर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी सायमाबी परवीन शेख कलीम वय २२ वर्ष हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी अब्दूल कलीम शेख साहेब रा. वडनेर भोलजी याच्यासोबत झाला होता. तिला ११ महिन्यांची एक मुलगी आहे. सासरकडील मंडळी लग्न होताबरोबरच वारंवार पैशाची मागणी करुन शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याबाबत तिने वारंवार आम्हाला सांगितले. आम्ही मुलीला समजावून सांगून नांदावयास पाठवित असो; परंतु २७ मे रोजी पती अब्दूल कलीम शेख साहेब, हिराजाबी मो.साहेब, अ.शहीद मो.साहेब, अ. नाजीम मो.साहेब, नगबाबी शेख साहेब, निराकसे मो.साहेब सर्व राहणार वडनेर भोलजी यांनी संगनमत करुन माझ्या मुलीचा गळा आवळून तिला मारुन टाकले, अशा तक्रारीवरुन वरील सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी अप क्र.७0/१५ कलम ३0२, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 'That' marriage to the victim's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.