दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

By Admin | Updated: November 6, 2014 23:21 IST2014-11-06T23:21:48+5:302014-11-06T23:21:48+5:30

मेहकर तालुक्यातील घटना, सासरकडील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Marriage for two lakhs marriages | दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

मेहकर (बुलडाणा): माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याची घटना शहरात घडली असून, याप्रकरणी सासरकडील ९ जणांविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील अफरीनबी शे.अमीन हिच्याकडे तिच्या सासरकडील मंडळींनी माहेरवरुन २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता; परंतु अफरीन शे.अमीन ही सासरकडील मंडळींच्या मागणीची पूर्तता करु शकत नसल्याने सासरकडील मंडळी तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत होते. यासंदर्भात अफरीनबी शे.अमीन हिने मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शे.अमीन शे.नुरमहंमद, शिरफानबी शे.नुरमहंमद, शे.आसिफ शे.नुरमहंमद, शे.आरिफ शे.नुरमहंमद, शे.नाजबी शे.आरिफ, अफसाना शे.आरिफ, शे.सलीम शे.हसन, जैबू शे.सलीम, शे.अमीन शे.सलीम सर्व रा.अंढेरा यांच्याविरुद्ध कलम ४९८, ३२३, ५0४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्या त आला आहे.

Web Title: Marriage for two lakhs marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.