माहेरी आलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू
By Admin | Updated: November 14, 2016 02:49 IST2016-11-14T02:49:01+5:302016-11-14T02:49:01+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ग्राम चौथा येथील घटना.

माहेरी आलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू
धाड, दि. १३- दिवाळी सणाला माहेरी आलेल्या विवाहितेचा शेतातील विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
धाड येथून १५ कि.मी. अंतरावरील ग्राम चौथा येथील किरण सुदाम नरोटे (वय २१) रा. गुम्मी ह.मु.चौथा ही विवाहिता दिवाळी सणानिमित्त माहेरी आली होती. आज सकाळी ती आपल्या बहिणीसह वडिलांचे शेतात गेली. शेतातील विहिरीतून पाणी काढताना तिच्या पायाखालचा असणारा दगड सरकला व ती तोल जाऊन विहिरीत पडली. दरम्यान, तिच्या बहिणीने आरडाओरड केली व बहिणीच्या मदतीस लोकांना बोलावले. आसपास असणारे शेतकरी घटनास्थळी धावून येईपर्यंत विवाहिता बुडून मृत झाली होती. यासंदर्भात मृतकाचा काका तेजराव नप्ते यांनी धाड पोलिसात माहिती दिली. यावरून पोलिसांनी र्मग दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.