विवाहीतेचा नदीत बुडून मृत्यू

By Admin | Updated: October 15, 2016 19:32 IST2016-10-15T19:32:33+5:302016-10-15T19:32:33+5:30

कपडे धुण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय महिलेचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी भोटा येथे घडली.

Marriage drowns in river | विवाहीतेचा नदीत बुडून मृत्यू

विवाहीतेचा नदीत बुडून मृत्यू

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
खामगाव, दि. १५ - कपडे धुण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय महिलेचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी भोटा येथे घडली. नांदुरा तालुक्यातील भोटा येथील सौ.ज्योती योगेश पारस्कार (वय २५) ही विवाहीता कपडे धुण्यासाठी सकाळचे सुमारास तिच्या जेठानीसोबत पूर्णा नदीवर गेली होती. 
दरम्यान कपडे धुतावेळी टोपले नदीच्या पाण्यात गेल्यामुळे ते काढण्यासाठी गेली असता तोल जावून नदीत पडली. यामध्ये पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती नातेवाईकांना व पोलिसांना मिळताच घटनास्थळी जलंब पोलिसांनी धाव घेतली. 
मृतक विवाहीतेचे प्रेत नदीतून काढून उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक सामान्य रूग्णालयात आणले होते. येथे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जलंब पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास जलंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.एम. माकोडे करीत आहेत.

Web Title: Marriage drowns in river