बाजार सुसाट; ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:44+5:302021-06-18T04:24:44+5:30
ना मास्क बुलडाणा शहरात भरणाऱ्या नियमित बाजारातील पाहणी केली असता, अनेक ग्राहक विना मास्कचे दिसून आले. काहींनी रुमालाचे मास्क ...

बाजार सुसाट; ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग!
ना मास्क
बुलडाणा शहरात भरणाऱ्या नियमित बाजारातील पाहणी केली असता, अनेक ग्राहक विना मास्कचे दिसून आले. काहींनी रुमालाचे मास्क लावले होते; परंतु ते तोंड आणि नाक झाकण्याऐवजी हनुवटीवर लावलेले होते.
ना फिजिकल डिस्टन्सिंग
डोणगाव येथील आठवडी बाजार बुधवारला भरतो; परंतु या बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार आठवडी बाजार भरला नाही. त्यामुळे दररोज भरणाऱ्या या बाजारातच एवढी गर्दी वाढली, की यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे पाहावयास मिळाले.
कोरोनाची भीतीही नाही...
बाजारातील वाढणाऱ्या गर्दीमुळे ग्राहकांना कोरोनाची भीती नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाजारात विनामास्क येणाऱ्या ग्राहकांची अँटिजन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चाचणीच्या भीतीने नागरिक मास्कही लावतील.
विक्रेतेही बेफिकीर
ग्राहकांसह विक्रेतेही बेफिकीर वागत असल्याचे चित्र बाजारात दिसून येते. ग्राहकच विना मास्क नाही, तर विक्रेत्यांनाही मास्क लावलेले राहत नाही. त्यामुळे विक्रेत्यांची कोरोना टेस्ट करून त्यांना मास्क बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.