वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ सुस्तावली!

By Admin | Updated: April 21, 2017 00:46 IST2017-04-21T00:46:31+5:302017-04-21T00:46:31+5:30

खामगाव : दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असून सध्या सूर्य आग ओकू पाहत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ देखील सुस्तावलेली आहे.

The market has been slow due to rising sunlight! | वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ सुस्तावली!

वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ सुस्तावली!

ठिकठिकाणी लागली थंड पेयाची दुकाने

खामगाव : दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असून सध्या सूर्य आग ओकू पाहत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ देखील सुस्तावलेली आहे. अंग भाजणाऱ्या उन्हामुळे शहरवासी सकाळी १०-११ वाजेपर्यंत बाजारपेठेतील कामे आटोपण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते.
उन्हापासून बचावासाठी नागरिक डोक्यावर कॅप, दुप्पटा बांधूनच घराबाहेर पडत आहेत. जीवाची लाही लाही करणारे ऊन सध्या असल्याने दुपारच्या वेळी रस्तेही सुनसान दिसतात. मुके प्राणीही झाडाच्या सावलीचा आसरा घेताना दिसतात. थोड्या काही प्रमाणातच नदीत पाणी सध्या शिल्लक आहे. नदीपात्रातील शेवाळ व विविध प्रकारच्या वनस्पतीही उन्हामुळे माना टाकत आहेत. पूर्वी जनावरेही नदीपात्रातील पाणी पिऊन आपली तृष्णा तृप्ती करीत. तसेच नदी परिसरातील हिरव्या चाऱ्यावर मोठ्या आनंदाने ताव मारत. परंतु सध्या नदीला पाणीही कमी असल्याने व नदी परिसरात चाराही नसल्याने जनावरांची भटकंती होत आहे. शहरातील मोठमोठ्या वृक्षाच्या सावलीत ही जनावरे बसून उन्हापासून आपला बचाव करीत असल्याचे बघावयास मिळते. परंतु सध्या पाहिजे त्या प्रमाणात शहरात वृक्ष नसल्याने वृक्षारोपण मोहिम हाती घेण्याची गरज आहे. शहरात ठिकठिकाणी सध्या थंड पेय व साहित्याची दुकाने लागली आहेत. वाढत्या गर्मीपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून अनेकांनी ऐरवी बंद राहणारे कुलर सध्या सुरु केले आहेत. मात्र, मुक्या प्राण्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

‘ग्रीन सिटी’साठी प्रयत्न करण्याची गरज
पूर्वी शहरातील अनेक भागात मोठमोठाले वृक्ष होते. परंतु विकासाच्या नावाखाली ते तोडण्यात आले. जे मोठाले वृक्ष सध्या शहरात आहेत त्यांच्या सावलीचा आधार मुके प्राणी घेताना दिसतात. ग्रीन सिटी करण्यासाठी स्थानिक न.प. प्रशासनाने विशेष प्रयत्न करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The market has been slow due to rising sunlight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.