शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:34 IST

लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्देबाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे.

- योगेश देऊळकारबुलडाणा : सध्या रब्बी हंगामातील शेतमाल शेतकºयांच्या हाती आला आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाºयांकडूनही खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे. एकंदरीतच ‘कोरोना’मुळे शेतकºयांचे अर्थचक्र बिघडले आहे. जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. परतीच्या पावसाने ऐन पिक काढणीला आले असतानाच मुक्काम ठोकल्याने प्रचंड नुकसान झाले. पेरणीचा खर्चही शेतकºयांच्या हाती आला नाही. मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे शेतकºयांची रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता पूर्णपणे मिटली; असे असले तरी अनेक ठिकाणी शेतजमिनीत ओलावा जास्त राहिल्याने रब्बी हंगाम लांबणीवर गेला. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याने विलंब होऊनही शेतकºयांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. खरीप हंगामातील उणीव रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून निघेल, अशी अपेक्षा बाळगून शेतकºयांनी उसणवारी करून पेरणी केली. सद्य:स्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकºयांच्या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे. दरम्यान, ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना आपला शेतमाल विकणे अशक्य झाले आहे. खासगी व्यापाºयांनीही व्यवसाय सुरू न ठेवता खबरदरी म्हणून घरातच थांबणे पसंत केल्याने शेतकºयांसमोर खूप मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसाठी उसणवारीने घेतलेले पैसे फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. आता ‘लॉकडाऊन’ संपल्यावर  बाजार समित्या सुरू होण्याची वाट पाहण्याशिवाय शेतकºयांसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

रब्बी पिकांना गारपीटीचा तडाखारब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील काही भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट आली आहे. आता शेतमाल विक्रीविना पडून असल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी