बाजार समितीच्या निवडणुकीत ८0 उमेदवार

By Admin | Updated: May 7, 2015 01:15 IST2015-05-07T01:15:33+5:302015-05-07T01:15:33+5:30

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

In the market committee elections, 80 candidates | बाजार समितीच्या निवडणुकीत ८0 उमेदवार

बाजार समितीच्या निवडणुकीत ८0 उमेदवार

चिखली : तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र चिखली कृषिउत्पन्न बाजार समितीवर ह्यकमांडह्ण मिळविण्यासाठी दिग्गज नेते व 'भाऊ'मंडळी सरसावले आहेत. संचालकांच्या १८ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत दिग्गजांच्या तीन पॅनेलसह इतर असे एकूण ८0 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. या निवडणुकीमध्ये आमदार राहुल बोंद्रे व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वा तील बळीराजा पॅनेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर व शिवसेना यांनी हातमिळवणी करीत उभे केलेले शिवराणा परिवर्तन पॅनेल, तर भाजप आणि शे तकरी संघटना स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ५७५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तर १५ एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी तब्बल ३६५ एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले हो ते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, ५ मे रोजी यातील २0४ अर्ज मागे घेण्या त आले होते. दरम्यान, ६ मे रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी चिन्हांसह जाहीर करण्यात आली असून, यानुसार ८0 उमेदवार या निवडणुकीत आ पले नशीब अजमावणार आहेत.

*अर्ज चिखलीचा, शिक्का जळगाव जामोदचा
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी साहाय्यक निबंधक (प्रशासन) उमेशचंद्र प्र. हुशे यांची यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय व सहकारदृष्ट्या महत्त्व राखणार्‍या या निवडणुकीला मात्र निवडणूक निर्णय हुशे हे फारसे गांभीर्याने घेत नसल्याची बाब उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांना मिळालेल्या पोचपावतीवरून दिसून आले. उमेशचंद्र हुशे यांनी उमेदवारी मागे घे तलेल्या उमेदवारांना पोचपावतीवर चिखली ऐवजी चक्क जळगाव जामोद कृषिउत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी असा उल्लेख असलेला शिक्का मारला आहे. ही बाब ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले व ५ मे रोजी आपला अर्ज मागे घेतलेले उमेदवार परमानंद अंबादास लहाने यांना मिळालेल्या पोचपावतीवरून सिद्ध झाले आहे.

Web Title: In the market committee elections, 80 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.